विधि व न्याय विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली सह सचिव, विधि व न्याय विभाग, औरंगाबाद हे कार्यालय आहे. प्रशासकीय सुविधेकरीता मराठवाड्यातील मा.उच्च न्यायालय, औरंगाबाद खंडपीठाशी संबंधित विविध प्रकरणे विविध विभागांकडून विधिविषयक अभिप्रायासाठी या कार्यालयाकडे संदर्भित केली जातात व या कार्यालयाचे कामकाज सह सचिव दर्जाचे अधिकारी पाहतात. सदर कार्यालयाचे कामकाजात खालील बाबी समाविष्ट होतात.
- दिवाणी व फौजदारी प्रकरणांमध्ये अभिप्राय देणे
- दिवाणी व फौजदारी प्रकरणांमध्ये न्यायालयात केस दाखल करणे
- रिट याचिका दाखल करणे
- शासनाच्या विरुध्द दाखल केलेल्या न्यायिक प्रकरणांमध्ये शासनाची बाजू मांडणे, तसेच शासनाच्या वतीने प्रकरणे दाखल करणे.
- दिवाणी व फौजदारी प्रकरणाच्या अनुषंगाने इतर प्रकारची कामे
पत्ता:
सह सचिव, विधि व न्याय विभाग
पहिा मजला, उच्च न्यायालय,
अदालत रोड, औरंगाबाद ४३१ ००५.
दूरध्वनी क्रमांक : 0240-2334292/2334296 (फॅक्स)